Ad will apear here
Next
आमची भाकर आणि चीनशी टक्कर!
आमची भाकर आणि चीनशी टक्कर!

महाराजांच्या मावळ्यांनी फक्त कांदा-भाकर खाऊन बलाढ्य शत्रूशी टक्कर दिली होती. आपल्या भाकरीत खरंच इतकी पॊष्टिक आहे की मोठ्या मोठ्या शत्रूंनाही आपण नमवू. आता तर खाणे आणि देश बलाढ्य करणे ह्याचा फार मोठा संबंध आहे. कसं ते समजून घेऊ...

"पुरब और पश्चिम" सिनेमात भारत सोडून पश्चिमी देशात राहणाऱ्या मुलाला एक पिता विचारतो, "जीवनभर पश्चिम पश्चिम करत राहिलास. काय दिलं तुला पश्चिमेने?"

त्या मुलाचा मुलगा तिथे येतो, पूर्वेचा द्वेष करणारा हा नातू बंदूक पुढे करून म्हणतो,
"हे दिलं पश्चिमेने!!"

पश्चिमेने जगाला शस्त्रे दिली आणि ती एकमेकांवर उचलायला प्रोत्साहन दिलं; पण मामला इथपर्यंत थांबला नाही. त्यांनी असे खाद्यपदार्थ पुरवले की माणूस जिवंतपणे मरेल. त्या यातना सहन होणार नाहीत तेव्हा औषध घ्यायला येईल आणि औषध पुरवणाऱ्या कंपन्या पश्चिमीच असतील. म्हणजे तेल त्यांचं, तूपही त्यांचंच... आमच्या हाती फक्त धुपाटणं!!

चीन हा तसा पश्चिमेचा नाही; पण त्यानेही आपल्या आरोग्याला घातक ठरतील असे पदार्थ हिंदुस्तानात आणले. इलेकट्रोनिक वस्तू, खाद्यपदार्थ, ड्रिंक्स हिंदुस्तानात आणून बाजारपेठ काबीज करण्याचा सपाटा लावला. तूर्तास जरी चीन शत्रू दिसत असला तरी हिंदुस्तानात आपली उत्पादने विकणारे इतरही देश आहेत. चीनच्या उत्पादनावर राग व्यक्त करताना इतर विदेशी उत्पादनेही त्यात विचारात घ्यावी लागतील.

१९९३ साली जागतिकीकरण झाल्यामुळे विदेशी कंपन्या हिंदुस्तानात आल्या. तेव्हा सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी आपली strategy बनवताना ठरवलं की लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक इत्यादी हिंदुस्थानी ड्रिंक्सचं महत्त्व कमी करायचं. त्यात ते यशस्वी ठरले आणि देशी पेये नेस्तनाबूत झाली.

विदेशी सॉफ्ट ड्रिंकने फक्त इतकंच नुकसान केलं नाही तर पंजाबमधील शेतकऱ्यांशी करार करून गव्हाच्या जागी आम्ही सांगू ते पीक लावायचं अशी अट घातली. ह्या कंपन्यांच्या प्रॉडक्ट्ला हवे तेच पीक पंजाबी घेऊ लागले. गव्हाचं कोठार अशी पंजाबची ओळख पुसली गेली. पाठोपाठ त्यांची लस्सी आणि जिलेबीही गेली. उरले फक्त विदेशी सॉफ्ट ड्रिंक्स.

हे विदेशी पदार्थ आपल्याला काय देतात?

एक पिझ्झा खालला तर एक सफरचंद खा असे डॉक्टर सांगतात. कारण पिझ्झ्यामुळे बिघडलेली पचन यंत्रणा (digestive system ) सफरचंदाने नियंत्रणात आणता येते.

मग प्रश्न येतो की पिझ्झा खावाच का? हाच प्रश्न पुढेही न्या. बर्गर, सॉफ्ट ड्रिंक, चिप्स, नुडल्स, चॉकलेट्स... ही यादी वाढत जाईल. मग लक्षात येईल की माझी तब्येत वारंवार का बिघडते. कधीतरी ऐकलं असेल की ऐंशी वर्षांचे कोणी आजोबा डॉक्टरकडे कधीही गेले नव्हते. मग मीच का वारंवार जातो.

पश्चिमी खाद्य खाऊन मला काय मिळतं?

नाचणी-ज्वारी-बाजरीची भाकरी, नारळाचं पाणी, उसाचा रस, लिंबू पाणी, फळांचा रस, कांदा, काकडी, झुणका भाकर असे भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेले पदार्थ खाल्ले तर आपण फक्त फिट होणार नाही तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. कदाचित, आत्महत्या थांबतील.

असे पदार्थ खाणे हा दुहेरी लाभाचा उपाय आहे कारण या पदार्थांचे उत्पादक भारतीय शेतकरी आहेत. आपण हे पदार्थ विकत घेतले तर त्याचे अंतिम लाभार्थी सामान्य शेतकरी असतात. शिवाय हे पदार्थ पचवण्यासाठी सोपे असतात. ह्या पदार्थांमध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर असतं. आपलं आतडं पोटात आलेला पदार्थ शोषण्याचा काम करतं. mixer सारखं दळण्याचं काम करत नाही. शेतात पिकलेले पदार्थ पाण्यासह पोटात येतात तेव्हा ते शोषून घेणं आतड्यांना सोपं पडतं. लठ्ठपणा, डायबेटीस, हृदय विकार होण्याची भीती नसते. म्हणजे अस्सल भारतीय पदार्थ सेवन केल्यामुळे दुहेरी लाभ होतो. शेतकऱ्यांच्या मालाला मागणी येते आणि ते पदार्थ खाणाऱ्यांना आरोग्य जपता येतं.

पण पिझ्झा, बर्गर, नुडल्स व कोल्ड-ड्रिंक्स दुहेरी नुकसान करतात. पहिलं नुकसान म्हणजे त्यांचा लाभ विदेशी कंपन्यांना होतो. जरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेतला तरी त्यापोटी ते शेतकऱ्याला खूप कमी पैसे देतात. शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करून त्यांना जास्त नफा कमावता येतो. शिवाय विदेशी पदार्थ पचवण्यासाठी कठीण असतात. त्यांचं पोषण मुल्य जवळ जवळ शुन्य असतं आणि ते अनेक आजारांना आमंत्रण देतात. म्हणजे भारतीय शेतकऱ्याचं नुकसान आणि आपलंही नुकसान. फायदा मात्र विदेशी कंपनीचा! त्या फायद्यातील खूप मोठा वाटा भारतात गुंतवला जात नाही. म्हणजे भारतीय ग्राहकांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारी विदेशी कंपनी देशाचं नुकसान करते... आज नवं श्रीमन्तांकडे आलेला पैसा विदेशी खाद्य पदार्थांवर खर्च होतो. म्हणून भारतात खूप संपत्ती असूनही शेतकरी आत्महत्या करतात. संपत्तीचा मोठा वाटा विदेशी कंपन्यांकडे जातो. भारतीय शेतकऱ्यांना लाभ होत नाही. पिकाच्या लागवडी इतकी किंमत मिळत नाही. त्याचवेळेस पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या विदेशी कंपन्या प्रचंड लाभ कमावतात.

नारळाचं पाणी कोणत्याही कोल्ड-ड्रिंक्सपेक्षा जास्त आरोग्यदायक आहे; पण नारळाचं पाणी फक्त आजारपणात पितात. गम्मत अशी कि चांगली आर्थिक स्थिती असलेले नवं-श्रीमंत कोल्ड-ड्रिंक्स पिवून आजारी पडतात आणि आजारपणात नारळचं पाणी पितात! विचार करा, आपण नारळाचं पाणी प्यायला लागलो तर सागरी किनारी राहणाऱ्या शेतकऱ्यांना किती रोजगार मिळेल?

कोल्ड-ड्रिंक्स पचवणं आतड्यांना कठीण असतं. त्यात भरलेली रसायन शोषण्याची क्षमता आतड्यांमध्ये नाही. उलट अशी रसायने आतड्यांचा नुकसान करतात. म्हणजे कोल्ड-ड्रिंक्स पिणारी व्यक्ती स्वतःला आजारी करून घेते आणि भारतीय शेतकऱ्यांनी निर्माण केलेला शेतमाल न घेवून त्याला तोट्यात ढकलते. त्याचा तोटा इतका होतो कि शेत पिकवण्यासाठी, झाड जगवण्यासाठी केलेला खर्च विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त होतो.

ह्या सगळ्याचा असा अर्थ अजिबात नाही की देशी कंपन्या, त्यांचे products सर्वोत्तम आहेत. अत्यंत महत्वाचं, देशी कंपन्या proffesional नाहीत; पण मागील २५ पेक्षा जास्त वर्षे विदेशी कंपन्या कशा काम करत होत्या हे आपण पाहिले, अनुभवले. त्यातून शिकून आपण आपल्यात बदल करू शकतो. ते इकडे येऊन फायदा कमवतात. आता आपण तिकडे जाऊन फायदा कमाऊ असा उलटा विचार करायची हीच वेळ आहे.

हिंदुस्थानी उद्योजक आणि विदेशी उद्योजक ह्यांच्यातील फरक पहा. टाटा, नारायण मूर्ती आणि इतर देशी उद्योजक मिळालेल्या नफ्यातून देशाला खूप काही देत आहेत.
आपण ह्या समाजाचं देणं लागतो हा भाव विदेशी कंपन्यांकडे कसा येईल? हा समाज त्यांचा नाही.

चला, साक्षर तर झालो. आता खरेदी साक्षर होऊ!!

- निरेन आपटे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IYFGCO
Similar Posts
कृषिप्रधान चीन जगाची ‘फॅक्टरी’ कसा बनला? फक्त भारतच नाही, तर जगातील अन्यही बहुतांश देश आपल्या सण-समारंभांचे सामान चीनकडून खरेदी करतात. अमेरिकेत हॅलोवीनपासून ख्रिसमसपर्यंतच्या सगळ्या सणांना लागणारे साहित्य चीनमध्ये बनवले जाते. साहजिकच मनात येते, जगाच्या लोकसंख्येसाठी पुरवठा करू शकेल, इतके उत्पादनसामर्थ्य चीनकडे आले कुठून? एक कृषिप्रधान देश अवघ्या
कोरोनाने विचारलेला प्रश्न, पैसा की माणूस? राज कपूरच्या "अनाडी" सिनेमात एक दृश्य आहे. नोकरी शोधणाऱ्या कफल्लक राज कपूरला एका श्रीमंत माणसाचं पैशाने भरलेलं पाकीट सापडतं. त्या श्रीमंत माणसाला शोधत तो एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. पाकीट द्यायला आलेल्या राज कपूरचा प्रामाणिकपणा पाहून श्रीमंत माणूस म्हणतो, "इथे आसपास जी धनवान मंडळी दिसतेय ना, त्यांनाही
सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे!! एक बाप मुलाला म्हणाला, "आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ." मुलगा भिंतीवर चढला. बाप म्हणाला, "आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे."
माथेरानच्या वन ट्री सारखा पाटील आपण भटकंती करताना अनेक माणसे भेटतात. काहींशी तात्पुरता संबंध येतो, तर काही जण कायमचे स्मरणात राहतात. जे कायमचे स्मरणात राहतात त्यांचा आणि आपला ऋणानुबंध जुळतो. पुन्हा एकमेकांना भेटलो नाही तरी आठवणींच्या कप्प्यातून ते अधूनमधून डोकावत असतात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language